04 October, 2022

 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते

स्वच्छ भारत अभियान 2.0 चे अनावरण

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : नेहरु युवा केंद्र संघटन तर्फे संपूर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा करीत आहे. स्वच्छ भारत समृद्ध भारत हा दृष्टिकोन ठेवून स्वच्छतेकडून समृद्धीकडे एक भारत विश्वात स्वच्छतेचा नारा देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर भारत बनवण्यासाठी राबविण्यात येणारा स्वच्छ भारत अभियान 2.0 हे 01 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारत देशात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातील नेहरु युवा केंद्राचे स्वच्छ भारत अभियान 2.0 चे अनावरण जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत आणि नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकांडे, अनिल बिनगे, श्रीकृष्णा पखावने, अजय धोतरे आदी उपस्थित होते.  

यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे अभियान आपल्या हिंगोली जिल्ह्यात गावपातळीवर कसे सफल होईल याविषयी मार्गदर्शन केले. आणि सर्व प्रशासकीय, निमशासकीय, ग्रामपंचायत,  एन.एस.एस., शाळा, महाविद्यालये, एनजीओ यांनी सहभाग घ्यावा, असे सुचविण्यात आले.

****

No comments: