10 November, 2022

 

फिट इंडिया प्रश्न मंजुषामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : फिट इंडिया प्रश्नमंजुषा-2022 अंतर्गत शाळास्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी फिट इंडिया प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. सहभाग नोंदवितांना प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी शाळेच्या युडीआय क्रमांकासह स्वत:चा ई-मेल समावेश करावयाचा आहे. सहभागी विद्यार्थ्यांची प्रवेश फी 50 रुपये ऑनलाईन पध्दतीने शाळेने भरावी लागणार आहे.

फिट इंडिया ही प्रश्न मंजुषा तीन स्तरावर ठेवण्यात आली असून अंतिम स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर ठेवण्यात आली आहे. स्तर मध्ये दि. 15 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शाळेतील केवळ 2 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. त्यासाठी http://fitindia.nta.ac.in या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्तर मध्ये प्राथमिक फेरीच्या बॅचमध्ये मोबाईलवर आधारित चाचणी होईल. या चाचणीमध्ये 60 प्रश्न राहणार असून त्याचा कालावधी 30 मिनिटाचा राहील. यापुढील स्तर मध्ये डिसेंबर,2022 या महिन्यात राज्यातील विविध शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यामध्ये देशातील 36 राज्यातील गुणवंताचा सहभाग राहील. त्या प्रश्नमंजूषामधून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी निवडला जाणार आहे.

या प्रश्न मंजुषा फेरीत बक्षिसाची एकुण रक्कम 3 कोटी 25 लाख रुपये आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यास 2 हजार रुपये, तर शाळेला 15 हजार रुपये, राज्यस्तरावरील दुसऱ्या उपविजेत्यास 5 हजार रुपये, तर शाळेला 50 हजार रुपये, राज्यस्तर पहिल्या उपविजेत्यास 10 हजार रुपये तर शाळेला 01 लाख रुपये आणि राज्यस्तर विजेत्यास 25 हजार, तर शाळेस 2 लाख 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या विजेत्यास 01 लाख रुपये, तर शाळेस 10 लाख रुपये, राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या उपविजेत्यास  01 लाख 50 हजार रुपये तर शाळेस 15 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.

अंतिम राष्ट्रीय विजेत्यास 2 लाख 50 हजार रुपये तर शाळेस 25 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. अंतिम स्पर्धा जानेवारी,2023 मध्ये होणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी फिट इंडिया प्रश्न मंजुषा-2022 मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन हिंगोली येथील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

*****

No comments: