14 November, 2022

 

भारतीय वायुसेनेच्या अग्निवीर वायू पदाच्या भरतीसाठी अर्ज करावे

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायू या पदावर भारतीय वायुसेनेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे.

या पदभरतीच्या माध्यमातून वायुसेनेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मिळणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी या जाहिरातीद्वारे अग्निवीर वायू या पदाच्या परिक्षेसाठी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर, 2022 हा आहे. या अंतिम दिनांकापूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: