19 November, 2022

 

 जिल्हाधिकारी कार्यालयात

इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ



 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची शपथही  सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

No comments: