24 January, 2024

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 01 फेब्रुवारी रोजी

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर (NCS) हिंगोली,  शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात धुत ट्रान्समिशन प्रा. लि. छत्रपती संभाजी नगर, पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि अमरावती, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वाशिम, एक्साईड इंडस्ट्रीज लि, अहमदनगर, BSS मायक्रोफायनांस लि. सोलापूर, टॅलेनसेतू सव्हिस प्रा.लि पुणे, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनांन्स लि. हिंगोली, मनसा मोटर्स (महिंद्रा) हिंगोली, नवकिसान बायो प्लॉनटेक नांदेड, मनसा मोटर्स प्रा.लि (टाटा मोटर्स) हिंगोली, रोहन सिक्युरिटी फोर्स हिंगाली, MR टेक्नो सर्व्हे गुजरात, क्रिष्णा मारोती लिमिटेड गुजरात, एक्सेल प्लेसमेंटस प्रा. छत्रपती संभाजी नगर, एसबीआय लाईफ इंन्सुरंन्स हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकीत कंपनी व हिंगाली जिल्ह्यातील शासनाची विविध महामंडळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत राहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हिंगोली, जिल्ह्यातील सर्व महामंडळेही रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक आर्हतेनुसार एक हजार पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in / www.ncs.gov.in  या संकेतस्थळावर अधिसुचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वतः मुळ कागदपत्रासह शिवाजी महाविद्यालय, कोथळज रोड, हिंगोली येथे गुरुवार, दिनांक 01 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दुरध्वनीवर किंवा  7972888970, 7385924589 या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा, असे अवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*******

No comments: