25 January, 2024

 

हिंगोली जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनास

टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : दुध उत्पादक शेतकऱ्यांना दि. 5 जानेवारी, 2024 च्या शासन निर्णयानुसार गाय दुधासाठी प्रती लिटर पाच रुपये अनुदान देय आहे. पात्र पशुधनास कानात टॅगींग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यावशक आहे.  त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुधनास टॅगींग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

पशुधनास टॅगींग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज अखेर पशुधन नोंदणी (Animal Registration)-3175, पशुपालक नोंदणी (Owner Registration)- 923, पशुपालक हस्तांतरण नोंदणी (Owner Transfer)-300, पशुधनाच्या नोंदीत बदल (Search and modify animal) – 328, कानातील टॅग बदल नोंदी (Tag change)-73, पशुपालकांच्या नावातील बदल (Search and Modity Owner)-14 याप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त 87 हजार 200 टॅग नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

मा. पशुसंवर्धन मंत्री यांनी दि. 24 जानेवारी, 2024 रोजी व्हिसीद्वारे घेतलेल्या बैठकीत सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना पशुधनास टॅगींगg व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्याचे कामकाज अभियान स्वरुपात राबविणे बाबत सूचित केले आहे.

त्यामुळे सर्व पशुपालक, शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पशुधनास टॅगींग व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करुन आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: