23 January, 2024

 जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी


 

हिंगोली (जिमाका), दि. 23 :  नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****  

No comments: