13 January, 2024

 



औंढा नागनाथ येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते

 आयुष्यमान भारत कार्ड अभियानांतर्गत शिबीराचे उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 :  जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसरात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत विशेष शिबीराचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी देशातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकास आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा मोफत मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनी त्यांनी यावेळी केले.

यावेळी औंढा तहसीलदार विठ्ठल परळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन हरण, महेश काकडे, मेडिकल ऑफिसर डॉ. महेश वामन देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: