08 January, 2024

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षी करीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जिवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक करीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडु), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), तसेच जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 दिनांक 29 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली असून या निमावली नुसार सन 2022-23 या वर्षासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी दिनांक 08 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. अधिक माहिती व अर्जाचे नमुने  https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आदिंनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राजेश्वर मारावार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

******

 

No comments: