24 January, 2024

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत इसापूर रमना येथे

बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती

 



हिंगोली (जिमाका), दि. 24 :  हिंगोली तालुक्यातील मौजे इसापुर रमना येथे श्री शिवाजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर जि. प. मा. शाळेमध्ये संपन्न होत आहे. या अनुषंगाने शिबीरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे या व्याख्याते म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह प्रतिबंध या विषयावर पथ नाट्य सादर केले. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह निर्मूलन या विषयावर बाल विवाह म्हणजे काय, बालविवाहाची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्ष पुर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्याम रु एक लाख दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असुन या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात वालविवाह होणार नाहीत व याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले. जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी सर्व उपस्थितांकडून बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचे वाचन करुन शपथ घेण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी बालकांसाठी तात्काळ मदत करणारा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाल विवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्प लाइन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, असे उपस्थित गावकऱ्यांना सांगितले.

शेवटी या कार्यक्रमासाठी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संगीता मुंढे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुनिल कांबळे, कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बळीराम शिंदे, प्रा. संजय चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्याथों, किशोरवयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.

******

No comments: