21 January, 2024

 

मराठा व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांना

हिंगोली येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण



 

• वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

* 23 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात 

* सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षक व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हिंगोली तालुक्यातील पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित पर्यवेक्षक व प्रगणकांना वेळेत सर्वेक्षण  पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 

यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. 

हिंगोली तालुक्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाच्या सर्वेक्षणासाठी 55 पर्यवेक्षक व 877 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे सर्व पर्यवेक्षक व प्रगणक घरोघरी जाऊन आवश्यक ती  माहिती गोळा करणार आहेत.  या सर्व पर्यवेक्षकांना व प्रगणकांना तालुकास्तरावर दि. 21 व 22 जानेवारी, 2024 रोजी दोन दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर दि. 23 जानेवारी, 2024 पासून प्रत्यक्षात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पर्यवेक्षकांना व प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

******

No comments: