09 January, 2024

 गटई स्टॉल योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

                                                                                                             

हिंगोली (जिमाका), दि. 09 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्यामार्फत गटई कामगारांना गटई काम करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या गटई स्टॉल योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छूक लाभार्थ्यांनी http://samajkalyanhingoli.in या संकेतस्थळाला भेट देऊन व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क करुन दि. 31 जानेवारी, 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेसाठी अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र (ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजार पेक्षा जास्त नसावे.) , रेशन कार्डाची छायांकित प्रत, गटई काम करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (शहरी-नगरसेवक, ग्रामीण-ग्रामसेवक), यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणापत्र, सक्ष प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जागेचा दाखला किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या मालकीची जागा असल्यास त्यांचे नाहकरत प्रमाणपत्र, वयाचा पुरावा (कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 60 वर्षे), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्राची व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

******  

No comments: