15 January, 2024

 

रस्ता सुरक्षा अभियानाचे 16 जानेवारी रोजी उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उद्घाटन दि. 16 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोटार सायकल रॅली (हेल्मेट रॅली) ने सुरुवात होणार आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली मार्फत दि. 15 जानेवारी ते दि. 24 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान-2024 राबविण्यात येणार आहे. यामध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात बॅनर्स, प्रसिध्दी पत्रकाचे वाटप करणे, वाहनाना रिफलेक्टीक टेप बसविणे, हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे, पादचाऱ्यामध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे, No Honking/ Do not Horn Please याविषयी जनजागृती करणे, अपघात प्रवण क्षेत्राची तपासणी करणे, अतिवेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनावर कारवाई करणे, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे. Drunk & Drive अंमलबजावणी मोहिम राबविणे, हेल्मेट परिधान न करणे/सिटबेल्ट न लावलेल्या चालकांवर कारवाई मोहिम राबविणे आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

सर्व नागरिक, वाहनचालक, वाहन मालक यांनी रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी दि. 16 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता कवायत मैदान, हिंगोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

*****

No comments: