25 January, 2024

 

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा व ग्रामीण होमस्टे स्पर्धेसाठी

31 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे सामाजिक आणि पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सर्वोत्कृष्ट गाव स्पर्धा-2024 व ग्रामीण होमस्टे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

            सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेसाठी हेरिटेज, कृषि पर्यटन, क्राफ्ट, जबाबदार पर्यटन, हरित गावे, दोलायमान गावे, प्रवेशयोय पर्यटन, साहसी पर्यटन, समुदाय आधारित पर्यटन, सर्वात स्वच्छ गाव, अध्यात्मिक आणि निरोगीपणा या श्रेणीतील गावांना नामांकन पत्रे सादर करता येणार आहे. सवोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात होणार आहे.

            तसेच ग्रामीण होमस्टेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने ग्रामीण होमस्टे स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धेसाठी व्हायब्रंट व्हिलेज, ग्रीन, समुदाय संचालित, महिला नेतृत्व युनिट, वारसा आणि संस्कृती, फार्म स्टे, कॉटेज, आयुवेर्दिक आणि वेलनेस, व्हर्नाक्यूलर आर्किटेक्चर, सर्व समावेशक पध्दती, क्लस्टर, जबाबदार पध्दती, ट्री हाऊस , व्हिला या श्रेणीतील होमस्टेंना नामांकन सादर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन मंत्रालयाच्या www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

            इच्छूक गावांनी व होमस्टे स्पर्धकांनी पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी, 2024 पर्यंत अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली केले आहे.

******

No comments: