22 January, 2024

 

हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग व वयोवृध्दांना निशुल्क कृत्रिम अवयव व साहित्य

वितरणासाठी तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगाना व वयोवृध्दांना एडीआयपी योजनेंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य साधने वाटपासाठी तपासणी व मोजमाप शिबीर         दि. 23 जानेवारी ते 27 जानेवारी, 2023 या कालावधीमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने तालुकानिहाय पार पडणार आहे.

तालुकानिहाय शिबिराचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात  दि. 23 जानेवारी, 2024 रोजी, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात 24 जानेवारी रोजी, सेनगाव ग्रामीण रुग्णालयात 25 जानेवारी रोजी, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 26 जानेवारी रोजी आणि कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात         दि. 27 जानेवारी, 2024 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रकारचे दिव्यांग व वयोवृध्दांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे आणि आपली तपासणी करुन लाभ घ्यावा, असे आवाहन राजू एडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

No comments: