09 January, 2024

 विदेशामध्ये जॉबसाठी महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या सोशल मिडिया चॅनलमध्ये सहभागी व्हा

                                                 -डॉ.रा.म.कोल्हे

* महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या उपक्रमातून विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्ण संधी

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग भून सोशल मिडिया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मिडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10 हजार पदांसाठी, युकेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिपरिचारिकेच्या 120 पदांसाठी तर फिनलँडमध्ये काळजीवाहकाच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतची माहितीही या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सोशल मिडिया चॅनलमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी होऊन विदेशामध्ये रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. या चॅनलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic  या लिंकला भेट द्यावी. आजच आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****  

No comments: