12 January, 2024

 

चला जाणूया नदिला अभियानांतर्गत स्थापन समिती सदस्यांनी

मार्गदर्शनपर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

·        राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थित होणार आढावा बैठक

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासन राबवित असलेल्या चला जाणूया नदिला अभियानांतर्गत जिल्ह्यातील आसणा व कयाधू नदी पुनरजिवित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये गाव निहाय आवश्यक आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा मुख्य समिती व तालुका मुख्य समिती याप्रमाणे विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याबाबतीत मॅगेसस पुरस्कार प्राप्त मा. राजेंद्रसिंह राणा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

तरी विविध समिती सदस्य यांनी रविवार, दिनांक 14 जानेवारी, 2024 रोजी उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा येथे सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  

****

 

 

 

No comments: