03 January, 2026
राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 03: राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव हे दि. 6 व 7 जानेवारी, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार, दुपारी 3 वाजता परळी येथून हिंगोलीकडे प्रयाण करून सायंकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
बुधवार, दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात दि. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीतील केलेल्या कामाचा आढावा घेतील. तसेच तालुक्यातील आदर्श आपले सरकार सेवा केंद्राची (ग्रा.पं.) पाहणी करतील.
दुपारी 2 वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अधिनस्त सर्व पदनिर्देशित व अपिलीय अधिकारी (नायब तहसीलदार, अभिलेखापाल व संबंधित डेस्क कर्मचारी) यांच्या संयुक्त बैठकीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
दुपारी 3 वाजता औंढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच तालुक्यातील आदर्श आपले सरकार सेवा केंद्राची (ग्रा.पं.) पाहणी करणार आहेत आणि सायंकाळी 5.30 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment