02 October, 2024
सामाजिक न्याय विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि.०२ : सामाजिक न्याय विभागातर्फे प्रती वर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एम.एल.पोपळाईत, समाज भूषण पुरस्कार्थी प्रा.विक्रम जावळे, मधुकर माजंरमकर, डॉ.विजय निलावार तसेच ज्येष्ठ नागरीक संघाचे खुशिरमियाँ मो. पठाण,श्री.जगताप, गोविंदराव घनतोडे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, सहाय्यक लेखाधिकारी श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, सुलोचना ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांना प्रमुख पाहुण्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन सुरेश पठाडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी 200 ते 250 ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment