08 April, 2022

 

कोविड-19 ने निधन झालेल्यांच्या कुटुंबातील 337 सदस्यांना

विविध प्रशिक्षणाचा लाभ

  • कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतूक

 

           हिंगोली, दि. 08  (जिमाका) : कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. कोविड-19 महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये राज्यातील अनेक नागरिकांचे निधन झाले आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आधार निखळला आहे. अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे. तसेच त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधावा या उद्देशाने मिशन वात्सल्य या अभियानाचे शासनाने आयोजन केले आहे.

            मिशन वात्सल्य अभियानाचा हेतू साध्य व्हावा व एक सामाजिक बांधिलकी म्हणून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांच्याकडून कोविड-19 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्य आत्मनिर्भर व्हावे व त्यांना रोजगार , स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचेच फलीत म्हणून हिंगोली जिल्ह्यातील 188 कुटुंबातील 328 सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत 4 कुटुंबातील 9 सदस्यांना हेल्थकेअर विषयक अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारे मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्ह्यातील 192 कुटुंबातील 337 सदस्यांना प्रशिक्षणाचा  लाभ देण्यात आला आहे.   

            मिशन वात्सल्य अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 एप्रिल, 2022 रोजी घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी  केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी  कौतुक केले, अशी माहिती डॉ. रा. म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

*****

No comments: