21 April, 2022

 





शेतकरी  ते थेट ग्राहक फळ पीक विक्री स्टॉलचे

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

हिंगोली (जिमाका),  दि. 21 :  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व औंढा  तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा शहरातील जिंतूर टी पॉईंट येथे विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक फळ पीक विक्री स्टॉलचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कृषी मंञी दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तसेच या आर्थिक वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेती अवजारे ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणीयंत्र , नांगर , पावर टिलर , पेरणी यंत्र दिले आहे, अशा  70  शेतकऱ्यांचा  कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक एस. के. दिवेकर, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी  एस. व्ही. लाडके, औंढ्याचे तालुका कृषी अधिकारी बबनराव वाघ यांच्यासह औंढा तालुक्यातील शेतकरी व कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.

******

No comments: