08 April, 2022

 

किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत

विविध अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील 960 युवक-युवतींना प्रवेश

  • नियमित प्रशिक्षणास सुरुवात

 

           हिंगोली, दि. 08  (जिमाका) : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेले क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्राच्या कौशल्याच्या मागणीनुसार विशिष्ट अभ्यासक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोलीच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवती आत्मनिर्भर व्हावे व त्यांना रोजगार, स्वयंरोजगार प्राप्त व्हावा यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणास सुरुवात झालेली आहे.

            यामध्ये जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी , औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील 960 युवक युवतींना इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्यूशन, रिटेल सेल्स असोसिएट, सीआरएम डोमेस्टीक नॉन व्हाईस, हँड एम्ब्रायडर, डोमेस्टीक डाटा एंट्री ऑपरेटर, सोलार पॅनेल इन्स्टॉलेशन टेक्नीशियन, इनव्हेंट्री क्लार्क, फिटर-मेकॅनिकल ॲसेम्ब्ली अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये त्यांचे नियमित प्रशिक्षण सुरु आहे. उद्दिष्टानुसार उर्वरित प्रशिक्षणार्थीची प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरु आहे, अशी माहिती डॉ. रा. म. कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी दिली आहे.  

*****

 

 

 

 

 

वृत्त 

No comments: