14 April, 2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

हिंगोली, दि. 14  (जिमाका) :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी व कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: