06 April, 2022

 



सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

 

हिंगोली, दि. 06  (जिमाका) :  महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक समता कार्यक्रमाचे नुकतेच उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झाले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डॉ. अजय कुरवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव एडके, शासकीय डायटचे प्राचार्य  गणेश शिंदे हे उपस्थित होते.

जिल्ह्यात सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त दिनांक 06 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम  राबविण्यात येणार आहेत. विभागातील सर्व महाविद्यालय, शाळा व वस्तीगृह आदी ठिकाणी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा लघुनाट्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा व विभागीय स्तरावर समाज कल्याण च्या स्वाधार शिष्यवृत्ती व मिनी ट्रॅक्टर  योजनांचे प्रतिनिधिक वाटप, जनजागृती शिबीर, आरोग्य विषयक शिबीर, रक्तदान शिबीरांचे आयोजन, शिवाय ग्रामीण व शहरी भागात समतादूतामार्फत सामाजिक  न्याय विभागाच्या विविध योजना बाबत प्रबोधन कार्यक्रम, महात्मा फुले जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम, मार्जिन मनी योजना कार्यशाळा, संविधान जनजागृती कार्यक्रम बरोबरच विविध व्याख्यान चर्चासत्र घेण्यात येणार आहेत.

 जिल्ह्यात दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा दरम्यान शेतकऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. महिला मेळावा तसेच तृतीयपंथी यासाठी जनजागृती व ओळखपत्र वाटप आदी कार्यक्रम उपक्रमासह ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये स्वच्छता व सुधार लाभार्थ्यांचे मनोगत कार्यक्रम आणि शेवटी दिनांक 16 एप्रिल रोजी समता कार्यक्रमाचा समारोप असे विविध कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी प्रास्ताविकात बोलताना दिली.

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार्टीचे समतादूत अशोक इंगोले  यांनी केले. तर आभार सिद्धार्थ गोवंदे यांनी मानले,

    या कार्यक्रमास बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक राजूलवार साहेब, समतादूत सुरेश पठाडे, आनंत बिजले, नखाते, सुनील वडकुते, बी.के. वाकळे, श्रीमती ढोणे मॅडम, श्रीमती गीते मॅडम, श्री टेंभुर्णी, संदीप घनतोडे, दीपक कांबळे, सखाराम चव्हाण, जयदीप देशपांडे, राहुल भराडे, रितेश बगाटे, तसेच पत्रकार विजय पाटील, विजय गुंडेकर, चंदू वैद्य, जाधव, शुभम यादव, पौळकर आदीसह समाज कल्याण, बार्टी व जात पडताळणी समितीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

 

No comments: