05 April, 2022

 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामाजिक प्रवर्गनिहाय निवडून आलेल्या

उमेदवारांची  माहिती संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

हिंगोली, दि. 04  (जिमाका) :  मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हील) क्र.980/2019 व इतर मध्ये दिनांक 04 मार्च, 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सन 1960 पासून अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थापनेपासून यापैकी  जो नंतरचा दिनांक असेल तेंव्हापासुन ते आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमधील सामाजिक प्रवर्गनिहाय निवडून आलेले उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत मागासवर्ग आयोगामार्फत कळविण्यात आलेले आहे.

ही माहिती 1960 या वर्षापासूनची असल्याने माहिती उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे  जेष्ठ नागरिक, जेष्ठ पत्रकार, सामाजिक संस्था, विविध शासकीय संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी  यांनी  जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीमध्ये 1960 पासूनच्या सामाजिक प्रवर्गनिहाय निवडून आलेल्या उमेदवारांची  माहिती असल्यास संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेला तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 

*****

No comments: