27 April, 2022

 


पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 30 एप्रिल व 01 मे, 2022 या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  शनिवार, दि. 30 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता विष्णू जिनिंग मैदान वसमत रोड परभणी येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण. रात्री 8.10 वाजता वसमत येथील जिल्हा परिषद मैदानात आयोजित गौतम बुध्द-महात्मा फुले-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 131 व्या जयंती उत्सवानिमित्त भव्य भीम गितांच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9.00 वाजता जिल्हा परिषद मैदान, वसमत येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम .

रविवार, दि. 01 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 ते 8.45 वाजता संत नामदेव कवायत मैदान हिंगोली येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती . 8.45 वाजता जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागास दिलेल्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करणे. 8.55 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. 9.00 ते 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. 11.30 ते 01.00 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम नियोजन, पाणी टंचाई आणि रोहयो इत्यादी विषयाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1.15 ते 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 ते 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. सांय. 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने जवळा बाजारकडे प्रयाण. सांय. 5.00 वाजता जवळा बाजार ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथे बाहेती मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन. सांय. 5.30 वाजता जवळा बाजार येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, परभणीकडे प्रयाण.  

****

No comments: