26 April, 2022

 

अन्न व्यावसायिकांनी वार्षिक परतावा

 31 मे पूर्वी ऑनलाईन दाखल करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.26 :  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अन्न सुरक्षा व मानदे अन्न व्यावसायिक यांचे परवाना व नोंदणी नियमन 2011 मधील नियम 2.1.13 (1) नुसार सर्व उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांना प्रत्येक वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अन्न व्यवसायाचा वार्षिक परतावा सादर करावयाचा असतो. आर्थिक वर्ष 2021-22 पासून हा वार्षिक परतावा सर्व उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावायाचा आहे. वार्षिक परतावा सर्व अन्न व्यावसायिकांनी foscos.fssai.gov.in  या प्रणालीवर  जाऊन आपल्या अकाऊंट वरुन अथवा फाईल एक्सप्रेस ॲन्युअल रिटर्न या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व उत्पादक, रिप्याकर व आयातदार यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा फॉर्म डी-1 मध्ये ऑनलाईन पध्दतीने 31 मे, 2022 पर्यंत दाखल करावयाचा आहे. 31 मे नंतर प्रत्येक दिवसाला 100 रुपये याप्रमाणे  विलंब शुल्क  भरुनच वार्षिक परतावा  सादर करावा लागेल.

तसेच 2020-21 या आर्थिक वर्षाचा  वार्षिक परतावा फॉर्म डी 1 मध्ये जागतिक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील  बरेच अन्न उत्पादक,  रीप्याकर व आयातदार यांनी आपला वार्षिक  परतावा फॉर्म डी 1 मध्ये 31 ऑगस्ट 2021 पर्यंत दाखल केलेला नाही. त्यांनी वार्षिक परतावा  फॉर्म डी 1 मध्ये ऑनलाईन  पध्दतीने जो काही दंड, शुल्क असेल त्या दंड व शुल्कासहीत  दाखल करावा.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा ऑनलाईन  पध्दतीने सादर न करणाऱ्या अन्न उत्पादक, रीप्याकर व आयातदार यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अन्न उत्पादक, रिप्याकर व आयातदार यांनी वार्षिक परतावा 31 मे,202 पर्यंत भरावा,  असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे.     

****

No comments: