13 December, 2022

ग्रामपंचायत मतदान केंद्र व मतमोजणी परिसरात 144 कलम लागू

 

              हिंगोली (जिमाका), दि. 13 : हिंगोली जिल्ह्‌यातील 62 ग्रामपंचायतीसाठी 190 मतदार केंद्रावर दि. 18 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 7.30 ते सांय.5.30 वाजेपर्यंत मतदार होणार आहे. तर दि. 20 डिसेंबर, 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र व मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.

            हिंगोली तालुक्यासाठी प्रस्तावित मतमोजणीचे ठिकाण उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह हिंगोली, कळमनुरी तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी येथील पहिल्या मजल्यावरील सभागृह, सेनगाव तालुक्यासाठी सेनगाव तहसील कार्यालयातील मिटींग हॉल येथे, औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयातील महसूल हॉल क्र. 1 येथे व वसमत तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयातील सभागृहात     दि. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

त्याअनुषंगाने हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीसाठी 190 मतदार केंद्रावर दि. 18 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 6.00 ते सांय.6.00 वाजेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी  दि. 20 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 7.00 ते सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

वरील मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत. हे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसर व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात व्यक्तीच्या समुहास मुक्त संचार प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

हे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी, कर्मचारी व मतदान केंद्राच्या परिसरातील मतदारास लागू होणार नाहीत. मतदान केंद्राच्या परिसरात व मतमोजणीच्या ठिकाणी 100 मीटरच्या आत खाजगी वाहन घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे.

 

******* 

No comments: