23 December, 2022

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल कायद्यांची विविध ठिकाणी जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली मार्फत बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील  जि.प.कन्या प्रशाळा आखाडा बाळापुर व वसमत तालुक्यातील  जि.प.प्रा.शाळा वाई येथे बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सदरील शाळेतील अधिकारी/कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बालकासाठी असणारे कायदे, यंत्रणा इत्यादी संदर्भात जनजागृती करण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन व यशदा यांचे संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुक्यातील नवनिर्वाचीत सरपंचांसाठी आयोजीत कार्यशाळेत ग्राम बाल संरक्षण समितीमध्ये बाल मित्र निवडणे बाबत व बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी अँड. अनुराधा पंडित व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. यावेळी सदरील शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी तसेच यशदा पुणे येथील सत्र समन्वयक हरीभाऊ पट्टेबहादुर, सत्र समन्वयक मारोती कदम, प्रशिक्षक सिध्दार्थ खंदारे यांची उपस्थिती होती.

******

No comments: