01 December, 2022

 

युवा गटाची मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

 

मार्जिनमनी योजनेच्या उद्योगासाठी आवश्यकतेनुसार कर्ज देण्यासाठी

सर्व राष्ट्रीयकृत बँका तत्पर

- एस.डी.सांवत, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 






हिंगोली (जिमाका), दि. 01 : मार्जिन मनी योजनेच्या उद्योगासाठी आवश्यकतेनुसार कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. डी. सांवत यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 01 डिसेंबर, 2022  रोजी  समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये युवा गटाची मार्जिन मनी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्री. सावंत बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक एस. ए. कादरी होते.

या कार्यक्रमात नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक आशिष पंत, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस.डी.सांवत, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले आदी प्रमुख वक्त्यांनी नवीन उद्योग उभारणीसाठी उपस्थित नव उद्योजकांना सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए. कादरी यांनी उद्योग नोंदणी ते उद्योग उभारणी पर्यंतची संपूर्ण माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांनी  केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन आत्माराम वागतकर यांनी केले.

            कार्यशाळेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी दीडशे ते दोनशे युवक उपस्थित होते.

*****

No comments: