05 December, 2022

 

बाह्ययंत्रणेद्वारे शिपाई पद भरण्यासाठी

दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :  येथील सहायक संचालक, नगर रचना कार्यालयातील वर्ग-4 मधील शिपाई संवर्गातील दोन रिक्त पदाचे कामकाज करुन घेण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्वावर उमेदवाराची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरुन मान्यता प्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून दरपत्रके मागविण्यात आले होते. परंतु प्राप्त दरपत्रकातील नमूद दरात सुसूत्रता व आवश्यक ती माहिती दरपत्रकात नमूद नसल्यामुळे या प्रकरणी आवश्यक ती पुढील कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील सहायक संचालक, नगर रचनाकार कार्यालयाकडे प्राप्त झालेली दरपत्रके विभागीय कार्यालयाकडून नामंजूर करण्यात आली आहेत.

दरपत्रकाचा विहित नमुना कार्यालयाच्या सूचना फलकावर डकविण्यात आला आहे. इच्छुकांनी आपले दरपत्रक विहित नमुन्यात सहपत्रासह प्रसिध्दीच्या दिनांकापासून दि. 12 डिसेंबर, 2022 पर्यंत सर्व तपशीलासह सहायक संचालक, नगर रचना, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष एस-3, हिंगोली-431513 या पत्यावर देण्यात यावेत, असे आवाहन सहायक संचालक, नगर रचना, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: