03 December, 2022

 सामाजिक न्याय समता पर्व निमित्ताने मंडणगड पॅटर्न

जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन






हिंगोली (जिमाका),दि. 03 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 03 डिसेंबर, 2022 रोजी  श्री.शिवानंद मिनगीरे-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर व तालुकास्तरावर योजनांच्या माहितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

               शिबीराचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या प्रतिमेच्या पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.

               समता पर्वा निमित्त शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर आयोजन करण्यात आले, त्यावेळी सदर शिबीरासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. राजु एडके-जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली हे उपस्थित होते. सदर शिबीरासाठी उपस्थित 355 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या विविध योजनांची माहिती सांगण्यात आली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उद्योगाकडे वाटचाल करावी, त्यासाठी समाज कल्याण विभाग मदतीसाठी तत्पर असल्याचे अध्यक्षीय समारोपामध्ये सांगण्यात आले.

               तसेच समता पर्व निमित्त जिल्ह्यातील विध्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मंडणगड पॅटर्न प्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात  येत आहे.

                  याचाच एक भाग म्हणून दि 3 डिसेंबर शनिवार रोजी भरारी सेवा भावी संस्था,हिंगोली येथे विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विषयक येणाऱ्या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन  कार्यक्रम घेण्यात आला .

   कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. शासनाच्या समता पर्व मधील विविध उपक्रमांची माहिती समतादूत अशोक इंगोले यांनी दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यपद्धती याबाबत समितीचे विधी अधिकारी श्री विनोद ठाकरे यांनी  मार्गदर्शन केले.

      मंडणगड  पॅटर्न प्रमाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे तसेच विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देणे बाबत ऍड विनोद ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी मागासवर्गीय व्यक्तींचे हक्क अधिकार यामध्ये जात वैधता प्रमाणपत्राचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित व शिक्षक यांच्या शंकांचे निरसन केले. त्यावेळी 150 ते 165 विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 

***

No comments: