26 December, 2022

 

विभागस्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या मुलांच्या गटातील स्पर्धेला सुरुवात ;

21 संघ सहभागी



 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : शालेय विभागस्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या मुलांच्या गटातील स्पर्धेला सलग दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले आहेत. 

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर सोमवार, दि. 26 डिसेंबर रोजी शालेय गटातील विभागस्तरीय कबड्‌डी स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्‌डी असोसिएशन हिंगोलीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार गजानन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, शिवपार्वती उद्योग समुहाचे संचालक ज्ञानेश्‍वर मामडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, निवृत्त शिक्षण अधिकारी शिवाजीराव पवार, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, आरोग्य विभागाचे ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा कबड्‌डी असोसिएशनचे सचिव प्रा.नवनाथ लोखंडे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा आयोजन समितीचे प्रमुख मेजर प्रा.पंढरीनाथ घुगे, आयोजन समितीचे समन्वयक कल्याण देशमुख, क्रीडा अधिकारी बस्सी, संजय बेत्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले. खेळांडुंना शुभेच्छापर मार्गदर्शन माजी आ.गजानन घुगे यांनी करताना जिल्हयात दिवसेंदिवस विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित होत आहेत. कबड्डीमध्ये पंचाचे योगदान महत्वपूर्ण आहे. खेळांडुंना यामुळे प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यातील शाळांना विभागस्तरावरील व अन्य स्तरावरील सामने पाहण्यासाठी निमंत्रित करावे, जेणे करुन खेळांडुंची आवड निर्माण होईल, असेही ते म्हणाले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला नारळ फोडुन प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन आयोजन समितीचे प्रमुख मेजर प्रा.पंढरीनाथ घुगे यांनी केले.

यावेळी आयोजन समितीतील सदस्य व पंच विशाल शिंदे, संजय भुमरे, नरेंद्र रायलवाल, दत्तराव बांगर, जफर खॉ पठाण, बल्लु पठाण, विजय जाधव, डिंगाबर कापसे, बालाजी नरोटे, शिवाजी इंगोले, प्रभाकर काळबांडे, भागवत इंगोले, संजय भुंमरे, गजानन राठोड, सुनिल सुकने, रामप्रसाद व्यवहारे, सोपान नाईक, कल्याण पोले, माधव चव्हाण, मोतीराम कोरडे, संतोष सोनपावले, केशव पारटकर, सुनिल बांगर, बाळु जाधव, रावसाहेब गेंडाफळे, बालु पाटील, गजानन कोकाटे, डॉ.शिवशंकर कापसे, दिलीप गव्हाणे, सुधाकर वाढवे व पत्रकार सुनिल पाठक, विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. 

*******

No comments: