05 December, 2022

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त

विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



                 हिंगोली (जिमाका),दि. 05 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार विविध उपक्रम वेळेत राबवून मराठवाडा मुक्ती संग्रमाचा अमृत महोत्सव यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री. गणेश वाघ, ए.एल.बोंद्रे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात दि. 17 सप्टेंबर रोजी व त्यानंतर वर्षभर विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सविस्तर आराखडा सर्व विभागांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागानी दिलेल्या आराखड्यानुसार माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर, 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. तसेच  आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे फोटो वेइसाईटवर अपलोड करावेत. तसेच नमूद आराखड्यानुसार सर्व विभागांनी आपणास नेमून दिलेले कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: