10 December, 2022

 

राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी घेतला

औरंगाबाद विभागातील लोकसेवा हक्क सेवांचा आढावा




हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे हे दिनांक 9 डिसेंबर,2022 रोजी लोकसेवा हक्क अधिनियम-2015 नुसार औरंगाबाद विभागामध्ये दिलेल्या लोकसेवा हक्क सेवांचा आढावा घेण्यासाठी आले होते.

यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तहसीलदार कार्यालयात भेट दिली. तहसील कार्यालयात लोकसेवा हक्क प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तहसील परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रात भेट देवून देत असलेल्या सेवांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित ग्रामीण जनतेला आणि केंद्र चालक यांना RTS MAHARSHTRA या मोबाईल APP ची ओळख करुन दिली. याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र चालक यांना निर्देश दिले. तसेच औरंगाबाद येथे आयोजित आयोगाच्या कार्यालयाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद विभागाचे प्रथम राज्य सेवा हक्क आयुक्त  डॉ.किरण जाधव यांनी मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे स्वागत केले. या बैठकीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री मणियार आणि विकास नियोजन विभागाच्या उपायुक्त विणा सुपेकर आणि उपसचिव दादासाहेब वानखेडे हे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला डॉ.किरण जाधव आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग औरंगाबाद यांनी औरंगाबाद विभागातील तालुका पातळीवरील सर्व पदनिर्देशित प्रथम व व्दितीय अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्याबाबतचा आढावा सादर केला.  या बैठकीत दिलीप शिंदे यांनी 100 टक्के सेवा आँनलाईन करणे बाबत सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी  जिल्हा परिषद यांना निर्देश देण्याबाबत सूचित केले. जनतेच्या हातात सेवा पुरविणे हे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे कर्तव्य आहे. सर्व नागरिकांना सेवा कशा घरपोच मिळतील याकडे लक्ष पुरविणेबाबत कार्यवाही करावी. औरंगाबाद विभागाच्या वतीने उपायुक्त श्री. मणियार यांनी या आर्थिक वर्षात पुरविण्यात आलेल्या सेवेबाबत सविस्तर अहवाल आयोगास सादर केला. ग्रामपंचायतच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सर्व सेवांचा आणि ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र यांचा सविस्तर आढावा उपायुक्त विकास श्रीमती.विणा सुपेकर यांनी सादर केला. राज्यातील सर्वात जास्त जनता ही ग्रामीण भागात वास्तव्य करुन राहत असल्याने ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचे बळकटीकरण करुन  सर्व सेवा केंद्रात मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि सर्व सेवा या डिजिटल स्वाक्षरीने निर्धारित वेळेत पुरविण्याबाबत राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी  दिले. औरंगाबाद विभागात बंद असलेली आपले सरकार सेवा केंद्र यांचा आढावा घेण्यात आला. सर्व बंद असलेली, अकार्यक्षम सेवा केंद्र यांना पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावर कायदेशीर कार्यवाही पार पाडणे बाबत विभागीय आयुक्तस्तरावर निर्देश देण्यात यावे, अशा सुचना दिल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात आपले सरकार सेवा केंद्र निर्माण करणे बाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. या अनुषंगाने कार्यवाही करावी. सर्व ग्रामविकास विभाग यांची सेवा केंद्र नियमित तपासणी करणे बाबत विकास नियोजन विभागाने प्रथम, व्दितीय अपील अधिकारी यांना उद्दिष्ट ठरवून देण्यात यावे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांची दरमहा बैठक तालुकास्तरावर घेण्यासाठी नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेला निर्देश देण्यात यावे, अशा सूचना उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग यांना देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला 100 टक्के अधिसूचित सेवा आँनलाईन मिळवून देणे हे आयोगाचे अंतिम ध्येय राहील या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणेने कर्तव्य करावे आणि   "आपली सेवा,आमचे कर्तव्य"  ब्रिद वाक्य सफल ठरवावे. अशा सुचना डॉ.किरण जाधव यांनी दिल्या. सभेचा समारोप औरंगाबाद येथील राज्य सेवा हक्क आयोगाचे उपसचिव दादासाहेब वानखेडे यांनी सर्वांचे आभार मानले.

*****

No comments: