20 December, 2022

 

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा संपन्न     

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा दि. 20 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथील मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाली.

या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील विजयी कुस्तीपटुंनी सहभाग नोंदविला व जिल्हास्तरावर फ्रीस्टाईल कुस्ती क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले वजन गट 35 मध्ये आदित्य गजानन सावळे प्रथम, वजनगट 38 कि.ग्रॅ. मध्ये भागवत कैलास सावळे प्रथम, वजन गट 41 कि.ग्रॅ. मध्ये जितेश भरत चौधरी प्रथम, वजन गट 44 कि.ग्रॅ. मध्ये युवराज रमेश कांदे प्रथम, वजन गट 48 कि. ग्रॅ. मध्ये सचिन प्रभाकर डाखोरे प्रथम, वजन गट 52 कि.ग्रॅ. मध्ये बलराज विशाल यादव प्रथम हे विद्यार्थी विजयी ठरले आहेत.

फ्रीस्टाईल 17 वर्षाखालील मुले वजन गट 41 ते 45 कि.ग्रॅ. या गटात लक्ष्मण वसंता शिंदे प्रथम, वजन गट 48 कि.ग्रॅ.मध्ये शिवाजी विठ्ठल शिंदे प्रथम, वजन गट 51 कि.ग्रॅ. मध्ये अमन गजानन नरवाडे, वजन गट 55 कि.ग्रॅ. मध्ये आदित्य अशोक वाघ प्रथम, वजन गट 60 कि.ग्रॅ.मध्ये रोहन सदाशिव खाडे प्रथम, वजन गट 65 कि.ग्रॅ. मध्ये कार्तिक विलास मंडलीक प्रथम, वजन गट 71 कि.ग्रॅ.मध्ये राजन संजय रोकडे प्रथम, वजन गट 80 कि.ग्रॅ. मध्ये सचिन विश्वनाथ गुठ्ठे प्रथम, वजन गट 92 कि.ग्रॅ. मध्ये ओंकार नामदेव निंबाळे प्रथम हे विद्यार्थी विजयी ठरले आहेत.

फ्रीस्टाईल 19 वर्षांखालील मुले वजन गट 57 कि.ग्रॅ. या गटात शेख फरदीन शेख सरदार प्रथम, वजन गट 61 कि.ग्रॅ. मध्ये साईनाथ माणिक काळे प्रथम, वजन गट 65 कि.ग्रॅ. मध्ये विष्णू पिंटू पवार प्रथम, वजन गट 70 कि.ग्रॅ. मध्ये लक्ष्मण चंदू चव्हाण प्रथम, वजन गट 74 कि.ग्रॅ. मध्ये गणेश काशिनाथ सावळे प्रथम, वजन गट 79 कि.ग्रॅ. मध्ये सखाराम सुनिल खंडाळे प्रथम, वजन गट 86 कि.ग्रॅ. मध्ये स्वप्नील मारोतो सावळे प्रथम हे विद्यार्थी विजयी ठरले आहेत.

फ्रीस्टाईल 14 वर्षाखालील मुली वजन गट 30 कि.ग्रॅ. या गटात नंदीनी रामेश्वर गोबाडे प्रथम, वजन गट 50 कि.ग्रॅ. मध्ये मोहिनी विलास मंडलिक प्रथम, वजन गट 54 कि.ग्रॅ. मध्ये सुहाणा अमजदखान पठाण प्रथम हे विजयी ठरले आहेत.

फ्रीस्टाईल 17 वर्षाखालील मुली वजन गट 43 कि.ग्रॅ. या गटात साक्षी नितीन काटकर प्रथम, वजन गट 46 कि.ग्रॅ. मध्ये श्रद्धा परसराम बोराटे प्रथम, वजन गट 49 कि.ग्रॅ. मध्ये रुपाली वसंता शिंदे प्रथम हे विजयी ठरले आहेत.

ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत 17 वर्षांखालील मुले वजन गट 45 कि.ग्रॅ. या गटात बाबाराम हनुमंतराव ढोबळे प्रथम, वजन गट 55 कि.ग्रॅ. मध्ये रोहन सुनिल इंगोले प्रथम, वजन गट 92 कि.ग्रॅ. मध्ये गजानन शिवाजी सूर्यवंशी हे विजयी ठरले आहेत.

ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले वजन गट 55 कि.ग्रॅ. या गटात शेख अरफान शेख हुसेन प्रथम, वजन गट 60 कि.ग्रॅ. मध्ये मंगल राजू जाधव प्रथम, वजन गट 70 कि.ग्रॅ. मध्ये स्वप्निल विश्वनाच गुठ्ठे  विजयी ठरले आहेत.

या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिव छत्रपती पुरस्कारार्थी प्रा. बंकट नंदलाल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पहेलवान कृष्णा पांडुरंग लुंगे, शारीरिक शिक्षक संजय ठाकरे, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, शिवाजी इंगोले आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत जिल्हास्तर खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे क्रीडा मार्गदर्शक नफीस पहेलवान, औंढा नागनाथ तालुका क्रीडा संकुल येथील क्रीडा मार्गदर्शक बालाजी नरोटे, पहेलवान गजानन पवार, पहेलवान रवी चौधरी, पहेलवान शेख अदनान  हे पंच व सामनाधिकारी म्हणून होते.

******

No comments: