17 February, 2023

 दहावी व बारावी परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

 

              हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च, 2023 या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा, दि. 2 मार्च ते 25 मार्च, 2023 या कालावधी माध्यमिक शालांत प्र्माणपत्र (दहावी) परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळ औरंगाबाद यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हिंगोली जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.

            त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर परिक्षेच्या कालावधीत सकाळी 9.00 ते सांय.5.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या परीक्षा केंद्राचे इमारत व परिसरात परिक्षेच्या शांततापूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलिफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध आहे. हे आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हे आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त कामी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचारी यांना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र (Calculater) इत्यादी घेऊन जाण्यास बंदी घातली आहे.

संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे.

 

*******

No comments: