03 February, 2023

 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने  मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय स्तरावर शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाही साठी पाठविण्यात येतात.  

या कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आले आहे,  या कक्षामध्ये पुढीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कक्ष प्रमुख म्हणून नायब तहसिलदार डी. एस. जोशी, सहाय्यक म्हणून अव्वल कारकून श्रीमती एम.आर. जाधव, महसूल सहाय्यक विजय घ्यार यांच्या नेमणुकीचे आदेश जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

*****

No comments: