11 February, 2023

 

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये

3 कोटी 51 लाख 12 हजार 494 रुपयांची 294 प्रकरणे निकाली

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 11 फेब्रुवारी, 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 154 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, वाद दाखलपूर्व 140 प्रकरणे असे एकूण 294 प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 3 कोटी 51 लाख 12 हजार 494 रुपये  रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्री. व्ही. बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यु. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यू. राजपूत, आय. जे. ठाकरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए.एम. जाधव, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. ॲड. सौ.व्ही.आर.देशमुख, ॲड. एम.एम.मोरे, ॲड. सौ.एस.एस.तांगडे, ॲड. आर. सी. लबडे, ॲड. डी. बी. खंदारे यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.

या लोकअदालतीमध्ये एकूण 1698 न्यायालयातील तडजोड योग्य प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 154 एवढे प्रकरणे निकाली  निघाली. तसेच या लोकअदालतीमध्ये वाद दाखल पूर्व प्रकरणे 4643 ठेवण्यात आली होती. त्यापैकी 140 एवढी प्रकरणे निकाली निघाली. असे एकूण 294 प्रकरणे निकाली निघीली आहेत. 

 

*****

 

No comments: