06 February, 2023

 

फिरते लोक न्यायालय व शिबिरांचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 06 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्यामार्फत परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 10 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे दि. 10 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता फिरते लोक न्यायालय व शिबिराच्या वाहनाचा उद्घाटन कार्यक्रम आयेाजित करण्यात आला आहे. 

परभणी व हिंगोली जिल्ह्यामधील संबंधित तालुक्यातील नमूद गावामध्ये फिरते लोक न्यायालय व शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचा जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील सतीपांगरा, कुरुंदा येथे 13 फेब्रुवारी, औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी, तळणी, सुरेगाव येथे 14 फेब्रुवारी रोजी, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी , हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, लोहगाव येथे 15 व 16 फेब्रुवारी रोजी व सेनगाव तालुक्यातील माकोडी, भानखेडा, हट्टा येथे 16 व 17 फेब्रुवारी रोजी फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात परभणी येथे दि. 10 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता फिरते लोक न्यायालय व शिबिराचे उद्घाटन होणार आहे. जिंतूर तालुक्यातील शेवडी, सावंगी, बामणी येथे 17 व 18 फेब्रुवारी रोजी, सेलू तालुक्यातील म्हाळसापूर, कुंडी, गुगळी धामणगाव येथे 18 व 20 फेब्रुवारी रोजी , मानवत तालुक्यातील रुढी, इरळद, मानवत रोड येथे 20 व 21 फेब्रुवारी रोजी, पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी, शिमूरगव्हाण, ढालेगाव येथे 21 व 22 फेब्रुवरी रोजी, सोनपेठ तालुक्यातील खपटपिंपरी, निमगाव, धामोनी येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी, गंगाखेड तालुक्यातील खंडाळी, बोथी, इसाद येथे 23 व 24 फेब्रुवारी रोजी, पालम तालुक्यातील डिग्रस, गुळखंड, फरकंडा येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी, पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव भाटे, चुडावा येथे 27 फेब्रुवारी रोजी आणि जिल्हा न्यायालय परिसर परभणी येथे 28 फेब्रुवारी, 2023 रोजी फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी दिली आहे.

***** 

No comments: