10 February, 2023

 

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती कार्यासाठी धावले युवक-युवती

 




हिंगोली (जिमाका), दि. 10 : सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय  हिंगोलीच्या वतीने आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान-2023 अंतर्गत जिल्हास्तरीय खूली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी  यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गणपत मिरगुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, डॉ. शिवाजी गीते,  वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, सहाय्यक योजना अधिकारी बी.आर.ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ही मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-इंदिरा गांधी चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-जिल्हा परिषद-जिल्हा परिषद कन्या शाळा ग्राउंड हिंगोली या मार्गे घेण्यात आली . या जिल्हास्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धेत सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच सर्वच गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक पाराजी बाबुराव गायकवाड ( बक्षीस 4000 रुपये ) तर दुसरा क्रमांक शिवाजी शिंदे (बक्षीस 2500 रुपये ), तर तिसरा क्रमांक अतिष चव्हाण ( 1500 रुपये) यांनी पटकावला. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक शितल वाघडव ( 4000 रुपये ), दुसरा क्रमांक श्रद्धा थोरात (2500 रुपये ) व तिसरा क्रमांक समता ढोंबरे (1500 रुपये ) हिने पटकावला आहे. स्पर्धेत जिंकलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.सचिन भायेकर यांनी केले. सूत्रसंचलन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांनी केले  तर आभार  वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील देशमुख यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. करिष्मा  जाधव, मंचक पवार, सी. सी. पाटील, जें. एस. जटाळे, एस. बी. जाधव, आरोग्य सहाय्यक डी.आर.पारडकर, सेठी, बालाजी मस्के, सहाय्यक संचालक कार्यालय, क्षयरोग कार्यालय. विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

*******

No comments: