08 February, 2023

 राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद हिंगोली व जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, हिंगोली द्वारा आयोजित सन 2022-23 या वर्षात 17 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 10 ते 12 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता, औंढा ना.रोड, हिंगोली ता.जि.हिंगोली या ठिकाणी करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 17 वर्षाखालील मुला-मुलींचे 16 संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, कोल्हापूर विभाग, लातूर विभाग, मुंबई विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग अशा आठ विभागातील विजयी संघाचे 200 खेळाडू (मुले/मुली) स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी दि. 11 व 12 फेब्रुवारी, 2023 रोजी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

No comments: