06 January, 2026
जनगणना 2027 पूर्वतयारीबाबत प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 06 : जनगणना 2027 च्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यासाठी आज, दि. 06 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता घरयादी गटांची रचना कशी करावी या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी मुंबई येथील जनगणना कार्यालयाचे सहाय्यक संचालक प्रविण भगत, तसेच सांख्यिकी अन्वेषक श्रेणी–I अरुण सालगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात घरयादी गटांची रचना, कार्यपद्धती तसेच आगामी जनगणनेसाठी आवश्यक बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, चार्ज ऑफिसर म्हणून तहसीलदार, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, नगररचना अधिकारी, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अश्विनकुमार माने, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, एल. जी. तोटावाड, संबंधीत महसूल सहाय्यक वहिदा काझी तसेच विविध कार्यालयांतील जनगणना कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी व रचना सहाय्यक उपस्थित होते.
जनगणना 2027 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही पूर्वतयारी महत्त्वाची असून प्रशिक्षणामुळे सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment