हिंगोली दि.10, (जिमाका): हिंगोली जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारांमध्ये
सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हेल्मेट सक्तीची संयुक्त मोहीम
सोमवार, दि. 20 एप्रिलपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे हेल्मेट न घालणाऱ्या
दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 129/177 अन्वये हेल्मेट
परिधान न करणाऱ्या चालकांवर कारवाईची तरतूद असून, या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन
कार्यालय, हिंगोली, शहर वाहतूक शाखा, हिंगोली तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त
विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या
मार्गदर्शनाखाली निर्देश देण्यात आले आहेत.
ही संयुक्त मोहीम दि. 20 एप्रिल ते दि. 30 मे
2026पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत हेल्मेट न वापरणाऱ्या
दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालक
व मालकांनी वाहन चालविताना अनिवार्यपणे हेल्मेट परिधान करावे, अन्यथा मोटार वाहन कायदा
1988 अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष
पाराशर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment