08 April, 2026

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवण्याचे युवकांना आवाहन

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेले भारतीय युवक पात्र आहेत. योजनेअंतर्गत देशातील नामांकित कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिली जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 9 हजार रुपये आर्थिक सहाय्य तसेच एकरकमी 6 हजार रुपये देण्यात येणार आहे.

इंटर्नशिपसाठी  नोंदणी  करण्यासाठी  https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावरील रजिस्टर नाऊ (Register Now) या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी  नोंदणी  करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी उमेदवारांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी  लिंक असणे गरजेचे असून, आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त झाल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

जिल्ह्यातील पात्र 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींनी दि. 10 एप्रिल 2025 पर्यंत नोंदणी करून या प्रशिक्षणाची  संधी  उपलब्ध करून घ्यावी. अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

 

******

No comments: