09 April, 2026

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 


हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा दि. 7 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 5 एप्रिल, 2026 होता.

मात्र, इच्छुक विद्यार्थ्यांच्या  सोयीसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी आवेदनपत्र सादर करण्यास 15 एप्रिल, 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

या बदलाची नोंद घेऊन पात्र उमेदवारांनी मुदतीत आपली आवेदनपत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.


*******

No comments: