हिंगोली(जिमाका), दि. 15 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड (कचरा डेपो) तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन त्यांनी कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, स्वच्छता उपाययोजना, कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट प्रक्रिया यांचा आढावा घेतला. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा डेपोची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पंपगृहाला भेट देऊन तेथील यंत्रणा, पाण्याचा पुरवठा, दाब व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या तसेच उद्भवणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment