हिंगोली (जिमाका), दि. 07: सद्यस्थितीत
भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून केंद्र शासनाने दि.
12 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यास 3744 कि.ली. केरोसीन नियतन मंजूर केले आहे.
या अनुषंगाने हिंगोली तालुक्यातील सर्व
किरकोळ, होलसेलर व सेमी होलसेलर परवाना धारकांनी आपल्याकडे असणारा संबंधित परवाना नूतनीकरणासाठी
तात्काळ तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा. केरोसीन वाटप करण्यास इच्छुक नसल्यास तसे
लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.
तसेच मूळ परवानाधारक मयत असल्यास, वारसाहक्काने
परवाना वर्ग करण्याबाबत प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
ही प्रक्रिया कालमर्यादित असल्यामुळे
उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांचा परवाना नूतनीकरण तसेच वारस प्रक्रियेबाबत कोणताही
विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी
केले आहे.
******
No comments:
Post a Comment