14 April, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 



हिंगोली ‍(जिमाका), दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, मनकर्णा जाधव यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: