हिंगोली(जिमाका), दि. 16 : उन्हाळ्यातील वाढत्या तीव्रतेचा विचार करून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांनी पक्क्या व शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) संबंधित कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार पक्क्या व शिकाऊ अनुज्ञप्ती संबंधित कामकाज दि. 20 एप्रिल 2026 पासून सकाळी 7.30 वाजता सुरू होऊन दुपारी 12.30 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात संबंधित मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, करण्यात आलेल्या कामकाजाचा अहवाल नियमितपणे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नागरिकांनी नवीन वेळेनुसार कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment